पार्थ पवारांना उमेदवारी देण्यासंदर्भात पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय होईल – जयंत पाटील

Parth Pawar - Jayant Patil

कोल्हापूर :- पंढरपूर (Pandharpur) विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचा काही दिवसांपूर्वीच कोरोनाने (Corona) मृत्यू झाला होता. त्यामुळे या मतदार संघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवार याना उमेदवारी देण्यासंदर्भात बातम्या झळकू लागल्या आहेत. दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मंगळवेढा विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली. पक्षाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय आहे तो होईल, असं ते म्हणाले. एका खासगी कार्यक्रमासाठी जयंत पाटील कोल्हापुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबरच भाजप पक्षावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस इस्लामपूरमध्ये येत आहेत मात्र ते स्वतःला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि पक्षाला स्थिरस्थावर करण्यासाठी येत आहेत. अनेक वेळा ते आले आहेत आणि बोलून गेले आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.

राजकीय नेता जर भाजपच्या विरोधात जातो त्यांच्यामागे ईडी लावण्याचं काम भाजप (BJP) करत आहे. देश हिताच्या निर्णयपेक्षा सूड भावनेच्या प्रवृत्तीने राजकीय नेत्यांच्या मागे लागले जाते. मात्र खडसे यांना पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

मराठा समाजाला (Maratha Community) दिलेल्या आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास देखील जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. शिवाय या आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ घेता येईल. निधी वाटपात सरकार दुजाभाव करत असल्याचा गैरसमज विरोधकांना झाला आहे. कोरोनाच्या संकटात निधी वाटपात थोडं मागेपुढे वाटलं असेल पण येणाऱ्या काळात समान वाटप होईल, यात शंका नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांकडून पार्थच पुनर्वसन, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीची उमेदवारी देणार ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER