सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणात आता पार्थ पवारांचीही उडी, सीबीआय चौकशीची मागणी

Shushant Singh Rajput & Parth Pawar

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Shushant singh Rajput) याच्या आत्महत्येची आता राजकीय नेत्यांनीही दखल घेतली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जवळपास ४० दिवसांचा कालावधी झाला आहे. तरी देखील त्यांच्या आत्महत्येमागीलखरं सत्य समोर आले नाही. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत ३७ पेक्षा जास्त जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहे. एवढचं नाही तर सुशांतची आत्महत्यानसून हत्या आहे, असं वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येबाबत चौकशी सोपवण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केली. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य चौकशी व्हावी अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी. ‘ असं ट्विट पार्थ पवार यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER