मावळ मतदारसंघात शरद पवारांना धक्का; नातू पार्थ पवार पीछाडीवर

Parth Pawar,lok-sabha-seat,shrirang-barne

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात  होते . येथे  शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांना कडवी लढत दिली. मात्र मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पार्थ पवार हे तब्बल १,३२,३८५ मतांनी मागे पडले असल्याची माहिती आहे.

मावळ मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत होता . इतकेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीतून आपली उमेदवारी माघारी घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच आपले नातू पार्थ पवार यांना संधी दिल्याचे म्हटले होते . राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली ताकद पणाला लावली. मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार असून  मावळचा खासदार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा मतदार संघातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा : http://bit.ly/LoksabhaResults