पार्थ पवार परीपक्वच; सामान्य कार्यकर्त्यांच्या एका पोस्टची दखल घेत केली तात्काळ मदत

parth-pawar

पुणे :  सोशल मीडिया (Social Media)आता दिवसेंदिवस अधिक प्रभावी होत चालला आहे. राजकीय नेत्यांपर्यंत एखादी गोष्ट पोहचवण्यसाठीही सोशल मीडियाचा उपयोग होताना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) एका सामान्य कार्यकर्त्यांने त्याची एडचण सोशल मीडियावर सांगितली. त्याची दखल राष्ट्रवादीचे युवा नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी तात्काळ मदत पोहचवलेली आहे.

पार्थ पवार या काही दिवसांत राजकीय मैदानात अधिक सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावरही पार्थ यांचा वावर चांगला असतो. त्यामुळे आजोबांच्या मते जरी पार्थ अपरिपक्क्व असला तरी त्यांच्या अनेक कृतीतून त्यांनी आपली परिपक्कवता सिद्ध केलेली आहे. त्यामुळे पार्थ पवार परिपक्वच असंच म्हणण्याची वेळ आली आहे.

जालना जिल्ह्यातील गोरख साबळे (Gorakh Sabade) या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली. काम करत असलेल्या कंपनीने पीएफ (PF) रखडवला असल्यामुळे कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती दिली. त्याच्या या परोस्टची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते पार्थ पवार यांनी संबंधित कार्यकर्त्यांशी संपर्क साधला व तातक्ाळ मदतही पोहचवली.

माझा पीएफ मिळत नसल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय प्रचंड आर्थिक संकटात असल्याचे सांगितल्यानंतर पार्थ पवार यांनी लगेच त्याला दहा हजार रुपयाची मदत देऊ केली तसेच, एक-दोन दिवसांमध्ये पीएफ रखडवलेल्या खाजगी कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत बोलून पीएफ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पार्थ पवार यांनी दिले.

 


 

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 

MT LIKE OUR PAGE FOOTER