पार्थ आर्त मनाचा आवाज ऐकतात, त्यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’कडे : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil & Parth Pawar

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थागिती दिल्यानंतर हतबल झालेल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी आज केलेल्या ट्विटमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी लक्ष घातलं पाहिजे. पार्थ पवार आर्त मनाचा आवाज ऐकतात, त्यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’कडे आहे. तसेच पार्थ यांच्या भाजप प्रवेशाचा अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही, असं सूचक विधान पाटील यांनी केलं.

चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) म्हणाले, पार्थ त्यांच्यातील आर्त मनाच्या आवाजाला जास्त महत्त्व देतात. त्यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’कडे सुरु आहे. मात्र याचवेळी त्यांच्या भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव अजून आला नाही. असेही पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचाही समाचार घेतला. मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्र सरकार काढू शकत नाही. आरक्षण हा राज्याच्या अधिकार क्षेत्रात येतो. इतकी वर्ष राजकारणात घालवूनही पवारांना याची जाणीव नाही का? असा उलट प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER