‘पार्थ लंबी रेस का घोडा हैं, थांबू नकोस मित्रा !’ नितेश राणेंकडून पार्थची पाठराखण

Parth Pawar - Nitesh Rane

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्याप्रकरणी (Suicide) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर पार्थ पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहेत, असे म्हणत पवार यांनी खळबळ उडवून दिली. त्यानंतर, भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक उपहासात्मक ट्विट केलं आहे. ‘पार्थ लंबी रेस का घोडा हैं’, असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आज परत सांगतो…पार्थ.. लंबी रेस का घोडा हैं !!! थांबू नकोस मित्रा.” नितेश राणे यांनी ट्विटमध्ये इतर कोणताही संदर्भ दिलेला नाही. मात्र शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर काही वेळातच त्यांनी हे ट्विट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER