अधिवेशनाआधी शनिवारपर्यंत खासदारांना कोरोना चाचणी सक्तीची

Parliament Rainy session Compulsory corona test

नवी दिल्ली : येत्या सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Rainy session) सुरू होत आहे. कोरोनामुळे, अधिवेशनाच्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी केली जात आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी शनिवारपर्यंत सर्व खासदार, संसद भवनात जाणारे सरकारी अधिकारी, मंत्र्यांचा स्टाफ यांना कोरोना चाचणी (corona test) करावी लागणार आहे.

सर्व खासदारांसाठी डीआरडीओ मल्टि युटिलिटी किट पाठविले आहे. खासदारांच्या सोयीसाठी संसद भवन अनेक्स परिसरात चार चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी सर्व दक्षता सरकार घेत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे उपाय योजले जात आहेत. विविध स्वरूपाची संसदीय कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यास संबंधित विभागांना सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER