
ओटीटी प्लॅटफॉर्मने (OTT Platform) अनेक कलाकारांच्या सिनेमांसाठी एक नवा मार्ग दाखवून दिला आहे. थिएटर बंद असल्याने अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर आले. मात्र आता थिएटर सुरु झाले असले तरी थिएटरवर सिनेमांची गर्दी होणार असल्याने अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले जात आहेत. याची सुरुवात सुपरस्टार अमिताभ बच्चनने केली होती. त्यानंतर बॉबी देओल, अक्षय कुमार, अजय देवगण, काजोल असे करीत ही यादी आता परिणीती चोप्रापर्यंत पोहोचली आहे. परिणीती चोप्राचा (Parineeti Chopra) अत्यंत महत्वाकाक्षी सिनेमा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ (The Girl on the Train) हा आता थिएटरऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे.
परिणीतीचा हा सिनेमा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ याच नावाने आलेल्या हॉलिवुडच्या सिनेमाची हिंदी रिमेक आहे. परिणीतीच्या सिनेमाचे दिग्दर्शन रिभु दासगुप्ता ने केले असून या सिनेमात परिणीतीसोबत अदिति राव हैदरी, कीर्ति कुल्हरी आणि अविनाश तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. खरे तर गेल्या वर्षीच मे महिन्यात हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार होता पण कोरोनामुळे थिएटर बंद असल्याने सिनेमा रिलीज होऊ शकला नव्हता.
कोरोना काळात घरी बसलेल्या प्रेक्षकांना अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स आणि डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी घरबसल्या मनोरंजनांची संधी उपलब्ध करून दिली. केवळ हॉलवुडच नव्हे तर मोठे हिंदी सिनेमेही या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी प्रेक्षकांसमोर आणले. आता थिएटर सुरु झाली असली तरी ओटीटीवर नवे सिनेमे येण्याचा सिलिसिला सुरुच राहिला आहे. नवीन वर्षाची सुरुवात ‘द गर्ल ऑन द ट्रेनने’ होणार आहे. खरे तर हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला जाणार होता. परंतु थिएटर मिळण्याची शक्यता कमी असल्याने निर्मात्यांनी हा सिनेमा ओटीटीवर आणणेच फायद्याचे ठरेल हे लक्षात घेऊन सिनेमा ओटीटीवर रिलीज केला जाणार आहे. बुधवारी नेटफ्लिक्सने या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करून सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
‘द गर्ल ऑन द ट्रेन’ 2021 मधील पहिला चर्चेत असणारा सिनेमा आहे जो ओटीटीवर रिलीड केला जाणार आहे. नेटफ्लिक्सने सिनेमाचा ट्रेलर शेयर करताना लिहिले आहे, या अनोख्या ट्रेन प्रवासात परिणीती चोप्रासोबत या. इशारा- स्वतःच्या रिस्कवर ट्रेनमध्ये चढा. असेही कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे. या सिनेमाचा 26 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर केला जाणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला