परेश रावल ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे नवे अध्यक्ष

Paresh Rawal - National School of Drama

मुंबई : अभिनेते, भाजपाचे (BJP) नेते, माजी खासदार परेश रावल (Paresh Rawal) यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (एनएसडी) (NSD) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. परेश रावल हे प्रसिद्ध राजस्थानी कवी अर्जुन देव चरण यांची जागा घेतील. अर्जुन देव चरण यांना २०१८ साली एनएसडीचे अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Prahlad Singh Patel) यांनी परेश रावल यांच्या नियुक्तीची माहिती ट्विटवर दिली. त्यांनी ट्विट केले – प्रसिद्ध कलाकार माननीय परेश रावल यांना राष्ट्रपतींद्वारे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या प्रतिभेचा लाभ देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना मिळेल. हार्दिक शुभेच्छा.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनदेखील याबाबत ट्विट करून ही माहिती देण्यात आली. परेश रावल यांचे एनएसडी कुटुंबात स्वागत, असे म्हटले आहे.

आव्हानात्मक, मात्र आवडणारे
आपल्या नियुक्तीवर रावल म्हणाले की, हे आव्हानात्मक, मात्र आवडणारे आहे. मी माझ्यातर्फे सर्वेश्रेष्ठ करेन. कारण हे असे क्षेत्र आहे ज्याला मी चांगल्या प्रकारे ओळखतो.

परेश रावल हे भाजपच्या तिकिटावर अहमदाबाद ईस्टचे खासदार होते. ते ‘पद्मश्री’ने सन्मानित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER