राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केल्याने पालकांनी व्यक्त केली चिंता

School

मुंबई : राज्य सरकारने (State Govt) शालेय विद्यार्थ्यांसाठी वयाची अट शिथिल केली आहे. आता ३१ डिसेंबरला ज्या बालकांचे वय तीन वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असेल तरच प्ले ग्रुपमध्ये (Play Group) प्रवेश मिळणार आहे. याच तारखेला सहा वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असल्यास पहिलीला प्रवेश मिळणार आहे. ही अंमलबजावणी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. यावर अनेक पालकांकडून संमिश्र प्रतिक्रिया (Parents expressed concern) आल्या आहेत.

अंजली आहुजा या पालकाने म्हटले की, “तारीख शिथिल केल्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची संधी असेल.” दुसरीकडे, काही पालक असे म्हणतात की, नर्सरी व श्रेणी-१ मधील प्रवेश मर्यादा सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत केली गेली आहे. पालक याकूब शेख म्हणाले, “जीआरनुसार दोन वर्षे व चार महिन्यांपर्यंतची मुले नर्सरीमध्ये शाळा सुरू करू शकतील. जर शालेय वर्ष एप्रिलमध्ये सुरू होईल (खासगी बोर्ड) आणि जर शाळा वर्ष जूनपासून सुरू झाले ( राज्य बोर्ड), अडीच वर्षांची मुले शाळेत जाऊ शकतील. “राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रुप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे. ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण होतील त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात प्ले ग्रुप/नर्सरीत प्रवेश घेता येईल. म्हणजेच अडीच वर्षांच्या वयातच त्यांना प्रवेश मिळेल.

ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात इयत्ता पहिलीत प्रवेश घेता येईल. कमी वयात शाळा प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. २०२१-२२ पासून हा नियम लागू होईल. शाळा प्रवेशासाठी बालकांच्या वयात शिथिलता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. प्रवेशासंदर्भातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर योग्य उपाययोजना हाती घेण्यासाठी याचसंदर्भात शिक्षण संचालकांची (प्राथमिक) एक सदस्यीय समितीदेखील नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसारच हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुलाला वयाच्या अडीचव्या वर्षी प्ले ग्रुप/नर्सरीला तर वयाच्या साडेपाचव्या वर्षी इयत्ता पहिलीला प्रवेश मिळू शकेल. दरम्यान, याआधी प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आले होते. आता मुख्याध्यापकांचा हा अधिकार काढून घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER