पालकत्वाची शैली आणि भावनिक बुद्धिमत्ता

Parental style and emotional intelligence

सध्या मुलासंबंधी दररोज पेपर मध्ये येणाऱ्या बातम्या, किंवा एकूणच येणाऱ्या नकारात्मक बातम्या कुठेतरी भावनिक बुद्धिमत्ता कमी पडत असल्याचे दर्शवतात. भावनिक बुद्धिमत्ता ही जोपासल्या जाऊ शकते, वाढवता येऊ शकते.

त्या साठी पालकत्वाची संकल्पना तपासून बघायला लागेल. पालकत्व ही संकल्पना विशिष्ट नातेसंबंध, विशिष्ट प्रक्रिया किंवा काही विशिष्ट कृतींच्या संदर्भात वापरली जाते. पालकत्व किंवा इंग्रजी मध्ये’ to parent ‘हे एक सक्रिय क्रियापद आहे आणि त्याचा अर्थ पालकांनी त्यांच्या मुलांसाठी केलेल्या सकारात्मक कृती असा होतो. पण मुळातच पालक म्हणजे कोण ? आपण सर्व साधारणपणे जन्मदात्या आई वडिलांना पालक असे म्हणतो. परंतु हे जन्मदात्या आई वडीलां पुरतेच सीमित नसते .मुलांचे संगोपन करणाऱ्या ,त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या किंवा त्यांच्या विकासावर भर देणाऱ्या सगळ्या व्यक्ती पालकत्वाच्या प्रक्रियेत समाविष्ट असतात. आणि त्या त्या काळाच्या संस्कृतीक आदर्श अनुसार पालकत्वाच्या प्रक्रियेमध्ये मुलांच्या गरजा पूर्ण केल्या जातात .मात्र हे आदर्श, पिढ्यानुसार बदलतात. अशाच प्रत्येक मुलाला शारीरिक स्वास्थ्य , आहार व योग्य संरक्षण देण्याची गरज असते. परंतु भावनिक गरजा या खालील प्रकारे विभागल्या जाऊ शकतात. एक म्हणजे प्रेम ,काळजी, बांधिलकी !दुसरे नियमामध्ये असणारे सातत्य आणि तिसरा विकासाला चालना देणे. मुलाने पुढे जाऊन एक भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सामर्थ्यवान व्यक्ती बनावे यासाठी या तिन्ही गरजा पूर्ण होणे आवश्यक असते.

पालक ह्या सगळ्या गरजा भागवण्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. म्हणूनच या संदर्भात पालकत्वाच्या पद्धती ना खूप महत्त्व आहे. काही वेळा पालक एकत्र काम करण्याऐवजी प्रतिस्पर्ध्या प्रमाणे एकमेकांशी वागताना दिसतात. आई वडील किंवा आजी-आजोबा या मुलांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती मध्ये मतभेद आढळतात.

उदाहरणार्थ एखाद्या सहा वर्षाच्या मुलाला दूध आणि शिरा खायला दिला आहे. पण त्याला मॅगी खायची आहे .आई वडील त्याला ठामपणे सांगतात की आत्ता जे समोर आहे तेच त्याला खावा लागेल आणि त्याचे म्हणणे ऐकत नाही. हे बघून तो लहान मुलगा आजी कडे जातो .त्याची आजी ती मागणी पटकन मान्य करते आणि मॅगी करून द्यायला तयार होते. आणि आई बाबांना सांगते की खाऊ द्या त्याला काय हवं ते. त्या निमित्ताने का होईना त्याच्या पोटात तर काहीतरी जात आहे. असा घरातल्या लोकांमधला विसंवाद बरेचदा जाणवतो. कारण प्रत्येक पालकाचा स्वभाव त्याला येणारे अनुभव, मुलांबाबत त्याच्या अपेक्षा, त्यांची मूल्य या सगळ्या गोष्टींमध्ये फरक असतो. त्यामुळे त्यांच्या पालकत्वाच्या पद्धतीमध्ये फरक जाणवतो. या पद्धती तीन प्रमुख प्रकारांमध्ये विभागल्या आहेत. काही उपप्रकार ही आहेत. परंतु हे वर्गीकरण एकदम पक्के नाही. प्रत्येक पालक हा या तीन किंवा चार पद्धतींमध्ये कोणत्यातरी एका बाजूला जास्त झुकलेला असतो, किंवा कधीकधी या पद्धतींमध्ये सरमिसळ देखील जाणवते. डॉ. ब्यूमरिंड या जगप्रसि्द्ध मनोवैज्ञानिक यांनी पालकत्वाच्या तीन महत्त्वाच्या पद्धती सांगितल्या व त्याचे काही उपप्रकार आहेत. त्या विशेषतः आपण आपल्या लहान मुलांवर प्रेम माया किती करतो आणि त्यांच्यावर किती बंधने घालतो यावर अवलंबून आहेत.

१) मोकळीक देणारे पालक किंवा परमिसिवह पॅरेंटिंग : म्हणजे जे पालक लोक जास्त मायेची ऊब देऊन बंधने जवळजवळ ठेवत नाहीत अशाप्रकारे मुलांना हाताळतात त्यांना म्हटले जाते.

२) अधिकारी वृत्तीचे पालक. अथोरेटीयन.: जे पालक जाचक बंधन पण मायेची उब कमी अशी पालकत्वाची पद्धत वापरतात त्यांना अधिकारी व्यक्तीचे पालक असे म्हटले जाते.

३) लोकशाही पद्धतीचे पालक किंवा ओथोरेटिव : मोकळीक देणारे ,बंधने न ठेवणारे पण मायेची ऊब देऊन मुलांची काळजी घेतात.

४) इंडीफ्रंट किंवा डीसमिसिंग : यात पालक मायेची ओढ कमी असून, बंधन अजिबात न ठेवता अशाप्रकारे वाढवतात.

यापलीकडे गेल्या काही वर्षांपासून एक नवीन पालक पद्धती उदयाला येते आहे. ही पद्धती म्हणजे “भावनिक प्रज्ञा युक्त पालकत्व” पद्धती ! यामुळे पालकत्वला एक नवीन दिशा मिळू शकते. ही नवीन पद्धती अमलात आणताना भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा उपयोग करून, स्वतःचे आचरणातून दाखवून, मायेची ऊब आणि बंधना यामध्ये समतोल राखण या पद्धतीत गृहीत धरलं जातं. नैसर्गिक पद्धतीने प्रेमाने आपण मुलांना वाढवतो, या पद्धतीने ही पालकत्वाची पद्धती अमलात आणता येत नाही तर त्यासाठी अडचणींवर मात करून, स्वतःमध्ये काही बदल घडवून, भावनिक बुद्धिमत्ता कौशल्य अमलात आणून, पालकत्वाला नवीन दिशा द्यावी लागते. तेव्हाच मुलांच्या भावनांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपण पार पाडू शकतो. त्यासाठी प्रथम आत्मपरीक्षण करून माझी पालकत्वाची पद्धत कुठली आहे ? हे जाणून घेणे आवश्यक असते.

म्हणूनच या पालकत्वाच्या पद्धतींची वैशिष्ट्य आणि त्याचा मुलांवर होणारा परिणाम समजून घ्यायला हवा.

१) परमिसिव परेंतींग : * मुलांमधील सर्व भावनिक अभिव्यक्ती ते मान्य करतात.* नकारात्मक भावना असलेल्या मुलाला धीर देतात परंतु वागणुकीवर काहीच अंकुश किंवा बंधन घालत नाही.*मुलांना भावनांबद्दल काहीच शिकवत नाहीत किंवा त्यांना मार्गदर्शन करत नाही.*वागणुकीबाबत काहीच दिशा दाखवत नाहीत*त्यांच्या मते नकारात्मक भावनांवर स्वार होणे किंवा त्यांना वाट मोकळी करून देणे हा एकच मार्ग असतो.

@ परिणामतः या प्रकारच्या पद्धतीमुळे मुलं भावनांचं नियमन करायला शिकत नाहीत. अशी मुलं लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे इतर मुलांबरोबर जुळवून घेऊ शकत नाहीत, आणि मैत्री संपादन करू शकत नाही.

२) अधिकारी वृत्तीचे पालक:*भावना व्यक्त करणे यावर टीका करतात किंवा कुत्सितपणे बोलतात*मुलांच्या भावनांवर बंधन घालणे हे प्रमुख उद्दिष्ट असतं.*भावना व्यक्त केल्यास त्यांना शिक्षा करतात.*राग,भीती वगैरे प्रदर्शित केल्यास व्यक्ती कमजोर आहे असं असं त्यांना वाटतं, समाज असतो.*मुलांच्या नकारात्मक भावना म्हणजे राग भीती एका विशिष्ट कालावधी पर्यंतच असणे योग्य आहे असं ते समजतात.

बऱ्याचशा पूर्वीच्या पालकांमध्ये किंवा बऱ्याच घरांमधून दुःख किंवा भावना व्यक्त करणं कमीपणाचं असं शिक्षणच मुलांना दिलं जातं. रडतोस काय मुलीसारखा ? असंही वरती म्हंटलं जातं. आपोआपच भावना व्यक्त न केल्या गेल्यामुळे त्या सप्रेस होतात आणि त्याचे वाईट परिणाम होतात. या पालकांची ही मुलं भावना या चुकीच्या ,अयोग्य, अवैध आहेत आपल्याच मध्ये काहीतरी जन्मजात दोष आहेत असं समजायला लागतात.

३) लोकशाही पद्धतीचे पालक : अलीकडे थोड्या प्रमाणात यात काही पालक असे आहेत. परंतु यांचे वैशिष्ट्य म्हणजे *स्वतंत्र होण्यासाठी पालक मुलांना मदत करतात.*ध्येय संपादन करण्यासाठी प्रोत्साहन देतात.*मात्र ध्येय संपादन करण्यासाठी शैक्षणिक प्रगती करण्यासाठी उच्च प्रकारच्या अपेक्षा केल्या जातात.पण भावना व नियोजन हा शब्द इथे गावीच नाही.

त्यातला एक उपप्रकार म्हणजे मुलांच्या दैनंदिन जीवनात पालकांकडून खूप लक्ष घातले जाते, पालक मुलांवर खूप जास्त प्रेम करतात, काळजी घेतात, खूप कमी अपेक्षा ठेवतात. परंतु त्या वातावरणात वाढलेली मुले देखील स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही ,सामाजिक संबंधांमध्ये ही मुले सक्षमतेने वावरू शकत नाही. ओव्हर प्रोटेक्शन म्हणू शकू आपण !

४) दिस्मिसिंग किंवा इनडिफरंट पालक: * मुलांच्या भावनांना कमी महत्त्व देतात *भावना कडे दुर्लक्ष करून त्यापासून स्वतःला विलग करतात, मुलांच्या भावना लवकर नाहीशा व्हाव्यात असं त्यांना वाटतं . म्हणूनच सर्वसाधारणपणे त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवणे म्हणजेच डिस्ट्रक्शन पद्धतीचा उपयोग मुलांच्या नकारात्मक भावना बंद करण्याच्या उद्देशाने हे पालक करतात.*कधीकधी मुलांच्या भावनांचाबाबत कुत्सितपणे बोलून त्यांची हेटाळणी देखील करतात, कधी मुलांच्या तीव्र भावना आणि स्वतःलाच विचलित चिंताग्रस्त होतात .नकारात्मक भावना या विषारी किंवा धोकादायक आहेत असंही त्यांना वाटतं.*अधिक लक्ष केंद्रित केल्यास परिस्थिती आणखीन बिकट होईल असा समज करून घेतात. थोडक्यात स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या भावनाबाबत कमी आत्मभान असून, मुलांच्या भावना मधून काय प्रतीत होत आहे ? यामध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नसतो.

आपोआपच अशा पालकांची मुलं ही असा समज करून घेतात की भावना असणे ,भावना व्यक्त करणे, म्हणजे काहीतरी चुकीचं आहे आणि आपल्यात तो दोष आहे असा समज ही मुलं करून घेतात. आणि त्यामुळे त्यांना जो परिणाम भोगावा लागतो तो तर असतोच.

फ्रेंड्स ! भावनांचे महत्त्व आपण जाणता. यापूर्वी या विषयावर याच कॉलम मध्ये लिहिलेल्या लेखांवरून भावनांचे नियोजन किती महत्त्वाचे आहे, हे आपल्याला कळलंच असणार आणि म्हणूनच अलीकडच्या काळामध्ये भावनिक प्रज्ञा युक्त पालकत्व ही एक नवीन संकल्पना पुढे आली. @ कसे असतात हे भावनिक प्रज्ञा युक्त पालक ? किंवा भावनिक प्रज्ञा युक्त पालक होण्यासाठी कुठल्या वैशिष्ट्यांची जरुरी असते ? तर मुलांमध्ये सहज रित्या आढळणारे राग, भीती किंवा दुःख या भावना म्हणजे आपल्या मुलांशी योग्य संवाद साधण्याची उत्तम संधी आहे हे ते समजतात. या त्यांच्या भावनेमुळे स्वतः विचलित न होता उलट योग्य पेशन्स ठेवून मुलांबरोबर वेळ द्यायचा आहे याचं भान त्यांना असतं. यासाठी खुद्द स्वतःला, स्वतःच्या भावनांची जाणीव आणि त्याचं महत्त्व ही पटलेलं असावं लागतं. किती छोट्या भावना असू देत त्यांच्याशी हे आई-बाबा अतिशय संवेदनशीलतेने समरस होऊन बोलतात. त्यांच्या भावनांचा आदर करतात .मात्र त्याच वेळेला जर अयोग्य वागणूक मुलांची होत असेल तर त्यावर वेळीच बंधन घालून त्याला योग्य दिशा देतात. मुलांना काय वाटतंय ? कसं वाटतंय ? हे स्वतः ठरवत नाहीत, तर जाणून घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ” भावनिक प्रज्ञा युक्त पालक होण्यासाठी “आपल्या सगळ्यांना उपयुक्त ठरणार आहे ते : मुल जेव्हा खूप भावनिक होतं त्या क्षणी-

  • त्यांचं बोलणं नीट लक्ष देऊन प्रेमाने आत्मीयतेने ऐकून घेणे.
  • त्यांच्या भावनांसाठी योग्य शब्द सापडत नसतील तर त्याची आठवण करून देणे.
  • भावनांच्या नियोजनाबद्दल मार्गदर्शन करणे.
  • या भावना कशा व्यक्त करायच्या तो मार्ग दाखवणे.
  • त्यांना पर्याय उपलब्ध करून देऊन प्रश्नावर दिशा दाखवणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः त्यांना रेडीमेड उत्तर देत नाही तर केवळ पाठिंबा, सपोर्ट, ऐकून घेणं, आणि स्वतःच्या भावना हाताळताना नेहमी आपण एक “रोल मॉडेल “आहोत याचे भान ठेवूनच भावना व्यक्त केल्या जातात आपोआपच मुले बघूनच भावनांचे व्यवस्थापन करायला शिकतात.

फ्रेंड्स ! आपण कुठल्या पालकत्वाच्या प्रकारात बसतो, याचा विचार करून आपण आपलीच पालकत्वाची शैली ओळखा आणि त्यात बदल करायचा असेल तर भावनीक प्रज्ञायुक्त पालक आणि त्यांची वैशिष्ट्य समजून घेऊन प्रयत्न करायला हरकत नाही.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button