परभणी: काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला शेंडा व बुडही आता राहिले नाही- शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे

पूर्णा तालुका प्रतिनिधी : मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणार्या महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रिड योजनेत परभणीचे नाव समाविष्ठ करणार असल्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणी येथील सभेत दिले.यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार मोहन फड, माजी ,आदिंसह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा वॉटरग्रिडमध्ये परभणीचा समोवश करण्याबरोबरच जिल्ह्यात वैद्यकिय महाविद्यालय आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.काँग्रेसला तर शेंडा व बुडही नाही या सभेत उद्धव ठाकरे यांनी राष्टटवादी काँग्रेस व काँग्रेसवरही फटकेबाजी केली.

2019 च्या विधानसभा निवडणूकीत समोर कुणी दिसतच नाही. काँग्रेस हा शेंडा व बुड नसलेला पक्ष असून अशोक चव्हाण हे नांदेडच्या कोण्या कोपर्यात काय बोंबलातायेत, ते लक्षात येत नाही. तर याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष थोरात हे जोरात आहेत. त्यांना जर बाजीप्रभु कळले असते तर आज त्यांच्यावर ही नौबत आली नसती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याविषयी बोलताना श्रीयुत पवारांनी केलेल्या एका विधानाचा संदर्भ देताना म्हणाले पवारांनाच मी स्वस्थ बसू देणार नाही. राष्ट्रवादी ही आचार व विचार नसलेला पक्ष असून, केवळ सत्ता आहे तिकडे झुकण ही या पक्षाची विचारधारा आहे.