परभणीत शाळा, मंदिरे बंद; विदर्भवासीयांना प्रवेशबंदी!

school & Tempel - Maharastra Today
school & Tempel - Maharastra Today

परभणी :- प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. यातच परभणीमध्ये रोज कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यातील धार्मिक स्थळेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

परभणी जिल्ह्यात दरदिवशी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. रोज ३०० ते ४०० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दहावी-बारावीचे वर्ग वगळता सर्व शाळा येत्या १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरेही पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या १५ एप्रिलपर्यंत विदर्भातील ११ जिल्ह्यांतील नागरिकांना परभणीत येण्यास बंदी आहे. तसेच परभणीतून विदर्भात जाण्यासही नागरिकांना बंदी आहे.

कार्यालयीन वेळांना चाप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आस्थापना सकाळी ७ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच दुपारी २ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

११ जण दगावल्याने खळबळ
परभणी जिल्ह्यात सध्या २ हजार ५३५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. काल दिवसभरात ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. जास्त गंभीर रुग्णांसाठी ६ DCHC कोरोना रुग्णालयात ९५५ खाटा आहेत. सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी DCH रुग्णालयात ६६२ खाटा आहेत. अत्यंत सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी १४२ कोरोना केअर सेंटर आहेत. एकूण ९ हजार ३५४ खाटा उपलब्ध आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एकही हॉटस्पॉट नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस महिन्याभरासाठी रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button