परमबीर सिंगांचे अंडरवर्ल्डशी संबंध? दुसऱ्यांदा चौकशी सुरू

Maharashtra Today

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविषयी दुसऱ्यांदा चौकशी सुरू झाली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pandey) या प्रकरणाची चौकशी करून आपला अहवाल सादर करतील. गावदेवीमधील पोलीस निरीक्षक अनुप डांगेंच्या आरोपांनंतर ठाकरे सरकारने (Thackeray Govt)चौकशीचे आदेश दिले आहेत.

अनुप डांगेंचे आरोप काय?

गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये असलेले अनुप डांगेंनी काही काळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांना एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात परमबीर सिंग यांच्यावर अंडरवर्ल्डशी मैत्री आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. अनुप डांगेंच्या म्हणण्यानुसार, २०१९ मध्ये एका पबवर छापा टाकण्यात आला. पबचे मालक जितू निवलानी यांनी परमबीर सिंग यांच्याशी संबंध असल्याची धमकी दिली होती. त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसले तरी संबंधित व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी विभागीय कार्यवाही करत असताना निलंबित करण्यात आले, असा दावा अनुप डांगे यांनी केला. अनुप डांगे यांच्या दाव्यानुसार त्यांना पब मालकाच्या सांगण्यावरून परमबीर सिंग यांनीच अडकवले होते.

परमबीर सिंग हे अंडरवर्ल्डमधील काही गुंडांच्या सेटिंगचे काम पाहात होते (Parambir Singh’s relationship with the underworld). क्राईम ब्रँचमार्फत ते डील करत होते, असा आरोप अनुप डांगे यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या  निकटवर्तीयाने त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करण्यासाठी दोन  कोटींची मागणी केली होती, असा दावा डांगेंनी केला होता. सध्या अनुप डांगे यांना गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा रुजू केले आहे. अनुप डांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने डीजी संजय पांडे यांना दिले आहेत. महाराष्ट्र सरकारच्यावतीने परमबीर सिंगप्रकरणी चौकशीचे हे दुसरे प्रकरण आहे, ज्यामध्ये तपासाचे आदेश दिले आहेत. यापूर्वी अँटिलिया स्फोटकेप्रकरणात तपासाची दिशाभूल केल्याबद्दल परमबीर सिंग यांच्याविरोधत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button