परमबीर सिंगांचा लेटरबॉम्ब कोणाला तरी खूश करण्यासाठी; जयंत पाटील यांचा आरोप

Parambir Singh - Jayant Patil - Maharashtra Today

पंढरपूर : शिवसेना (Shiv Sena) आणि वाझे (Sachin Vaze) यांचे संबंध जोडणे चूक आहे. वाझेंना शिवसेनेशी चिकटवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. वाझेंना आल्या आल्या जबाबदारी कोणी दिली, हे हळू हळू कळेल, असे राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणालेत. ते पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीविषयी चर्चा करण्यासाठी पंढरपूरला आले होते.

पाटील म्हणाले, कोणाला तरी खूश करण्यासाठी परमबीर सिंग (Parambir Singh) यांचा लेटरबॉम्ब आहे, असा कोणाचेही नाव न घेता आरोप करून त्यांनी केंद्र सरकारकडे संकेत केला. १७ वर्षांनंतर परमबीर यांच्या सहीनेच मोठ्या प्रकरणाचे तपास वाझेंकडे देण्यात आले आहेत. अंबानी यांच्या घराजवळ ठेवण्यात आलेल्या स्फोटके प्रकरणात जबाबदार कोण आहे, हे शोधण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा घेणार नाही. गृहमंत्रिपदी अनिल देशमुखच राहतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER