परमबीर सिंग खंडणी उकळायचे; दोघांची तक्रार

Parambir Singh - Maharastra Today

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मकोका लावून माझ्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये उकळलेत, असा आरोप क्रिकेट बुकी सोनू जालान याने केला. ही घटना २०१८ मधली आहे, असे तो म्हणतो. त्याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.

सोनू जालान याने याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस महासंचालकांनी हे प्रकरणा तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याचे कळते. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आणखी एकाने केला खंडणीवसुलीचा आरोप

केतन तन्ना या व्यक्तीनेही परमबीर सिंह यांच्यावर खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंह यांनी माझ्याकडून १ कोटी २५ लाख रुपये उकळले. याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. याप्रकरणात आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केतन तन्ना यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button