परमबीर सिंग, प्रदीप शर्मा, राजकुमार कोथिंबिरे यांनी माझ्या दोन गाड्या जबरदस्तीने नेल्या; व्यावसायिकाचा आरोप

Maharashtra Today

विरार : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh), निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथिंबिरे (Pradip Sharma, Rajkumar Kothimbire) यांनी माझ्या दोन गाड्या २०१७ मध्ये जबरदस्तीने उचलून नेल्या आहेत. (ठाणे दहशतवादविरोध पथक) या गाड्यांचा उपयोग करून अनेक गुन्हे घडलेत, असा आरोप विरारमधील व्यावसायिक मयूरेश राऊत (Mayuresh Raut) यांनी केला. मयूरेश म्हणालेत की, मला मनसुख हिरेन व्हायचे नाही. म्हणून मी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास विरार पोलिसांकडे आलो.

मात्र, पोलिसांनी माझी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, परमबीर सिंग आणि अँटेलियाबद्दल जे प्रकरण सुरू आहे त्याविषयी वर्तमानपत्रात माहिती येते आहे. २०१७ मध्ये माझ्या दोन गाड्या पोलिसांनी जबरदस्तीने नेल्या होत्या. त्यावेळी ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग होते. याशिवाय खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि त्यांचे सहायक अधिकारी राजकुमार कोथिंबीरे होते. त्यांनीच माझ्या गाड्या नेल्या आहेत.

तक्रार घेत नाहीत
२०१८ पासून मी उच्च न्यायालयाचा आदेश घेऊन वारंवार गेलो आहे. विरार पोलिसांकडे माझ्या हजारावर तक्रारी असतील. मात्र, आजपर्यंत त्यांनी काहीही कारवाई केली नाही. माझी तक्रार घेतली नाही. मला पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी मी पत्रात केली आहे. तक्रारीत परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथिंबिरे यांची नावे  वाचून हे आमच्या अखत्यारीत येत नाही, आमच्याकडे या ‘पॉवर्स’ नाहीत, असे सांगून पोलीस मला परत पाठवतात, असाही आरोप मयूरेश राऊत यांनी केला आहे.

माझ्याही जीवाला धोका
मनसुख हिरेन प्रकरणातदेखील अशाच प्रकारे व्यावसायिकांच्या जबरदस्तीने आणलेल्या गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. त्या प्रकरणात मनसुख हिरेन यांची  हत्या झाली. त्यामुळे माझ्या गाड्यांचाही यात काही वापर झालाय का हे माहीत नाही. पण माझ्या जीवालाही धोका आहे. हे लोक माझा जीव घेतील. मी त्यांच्या विरोधात तक्रारीसाठी प्रयत्न करतो आणि त्यांच्यावर आरोप करतो म्हणून मला त्यांच्यापासून धोका आहे. ते कधीही मला मारून टाकतील, असा आरोप करत राऊत यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button