उद्धवजी, शरद पवार शिवसेना संपवतायत : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil-Sharad Pawar-Uddhav Thackeray

सांगली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यभरात भाजपच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली जात आहेत. सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला.

शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) शिवसेनेवर दबाव आणून हे निर्णय घ्यायला भाग पाडले. उद्धवजी, शरद पवार (Sharad Pawar) हे शिवसेना संपवायला निघाले आहेत, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. संजय राठोड यांच्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होते, मग धनंजय मुंडे यांच्यामुळे होत नाही का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव आणत आहे. शरद पवार हे शिवसेना संपवायचे काम करत आहेत. वाझेंना निलंबित केले जाते तर शरद पवार आता अनिल देशमुख यांना का वाचवत आहेत? उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER