परमबीर सिंग अडचणीत; ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल, लवकरच अटकैची शक्यता

Parambir Singh - Maharastra Today

अकोला :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी (Parambir Singh in trouble) वाढ झाली आहे. परमबीर यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल (Atrocity Case Filed)करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना कधीही अटक केली जाऊ शकते. अकोल पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या भीमराव घाडगे यांनी २० एप्रिलला परमबीरसिंह यांच्याविरोधात राज्य सरकार आणि वरिष्ठांकडे तक्रार केली होती. त्यानुसार मध्यरात्री परमबीरसिंह यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

ठाणे (Thane) शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह विविध यंत्रणेकडे दिलं आहे. आता त्यांनी परमबीर सिंग यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप लावला आहे. परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

भीमराव घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्याविरूद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच अकोला येथील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये झिरो एफआयआर करुन हे प्रकरण आता ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button