मनसुख हिरेन हत्या प्रकरणी परमबीर सिंह एनआयएच्या कार्यालयात दाखल

Param Bir Singh - NIA - Maharastra Today
Param Bir Singh - NIA - Maharastra Today

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपद गमवावे लागले आहे. दरम्यान, अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही चौकशी सुरू केली आहे. परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले असून, एनआयएकडून (NIA) त्यांचा जबाब नोंदवला जात आहे.

एनआयए कार्यालयात परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवणार असून, अँटलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसेच वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिलेल्या विशेष अधिकारांबद्दल एनआयएकडून त्यांची चौकशी होणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेन (Manshuk Hiren) यांच्या हत्येचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून सुरू होता. नंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाचा तपास सोपवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button