परमबीर सिंग पुन्हा हायकोर्टात; ठाकरे सरकारविरोधात केला मोठा आरोप

Parambir Singh - Bombay High Court

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाचा (Bombay High Court) दरवाजा ठोठावला आहे. महाराष्ट्र सरकारने लावलेल्या चौकश्यांच्या विरोधात परमबीर सिंग यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

राज्य सरकारने परमबीर सिंग यांची दोन प्रकरणात चौकशी लावली आहे. या चौकश्यांविरोधात सिंग यांनी आज दुपारी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेत सिंग यांनी गंभीर आरोप केला आहे. १९ एप्रिल रोजी मी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना भेटलो होतो. यावेळी त्यांनी तुम्ही केलेल्या तक्रारी मागे घ्या. अन्यथा राज्य सरकारने तुमच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी केली आहे, असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सिंग यांनी याचिकेत केली आहे. सिंग यांनी आता राज्य सरकारवर नवा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या याचिकेवर येत्या ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button