परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा दिलासा ; ९ जूनपर्यंत अटक नाही

Bombay High Court-Parambir Singh

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंग यांना 9 जूनपर्यंत अटक होणार नाही आहे.

मुंबई उच्च न्यायालयाता ९ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत परमबीर यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली आहे.

परमबीर सिंग यांचे प्रकरण रेग्युलर कोर्टात चालवले जाणार आहे. परमबीर सिंग यांना तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली. तसंच 9 जूनपर्यंत अटक करणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारनं न्यायालयाला दिली आहे. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे आज यावर ऑनलाईन सुनावणी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button