‘परळ ब्रँड’ शिवसैनिक मोहन रावले यांचे निधन

Shiv Sena - Mohan Rawale

मुंबई : निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी खासदार मोहन रावले (Mohan Rawale) यांचे शनिवारी सकाळी गोव्यात निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. मोहन रावले हे वैयक्तिक कामासाठी गोव्यात गेले होते. यावेळी हृद्यविकाराच्या झटक्याने रावले यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

मोहन रावले हे दिवंगत शिवसेनाप्रमुख (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या काळातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. दक्षिण मुंबईत शिवसेना रुजवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. शिवसेनेतील बड्या नेत्यांपासून ते शिवसैनिकांपर्यंत प्रत्येकाशी त्यांचा दांडगा संपर्क होता.

भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मोहन रावले यांच्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ झाला. ते विद्यार्थी सेनेचे पहिले अध्यक्ष होते. याच संघटनेच्या माध्यमातून मोहन रावले यांनी आपले नेतृत्त्व प्रस्थापित केले. शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यानंतर मोहन रावले यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ते पाच टर्म दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे खासदार होते.

दरम्यान आज संध्याकाळी मोहन रावले यांचे पार्थिव मुंबईत अंत्यविधीसाठी आणले जाईल. यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या परळ शिवसेना शाखेत त्यांचे पार्थिव शिवसैनिकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER