… पप्पू सेना माझ्यावर भाळली आहे; लवकरच परत येते – कंगनाचा सरकारला टोमणा

Kangana Rananut & Uddhav Thackeray

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर तिने महाराष्ट्र सरकारला डिचवत टोमणा मारला आहे – … महाराष्ट्रात बसलेली पप्पू सेना माझ्यावर भाळली आहे. … लवकरच तिकडे येणार आहे.

कंगनाने ट्वीटसोबत स्वतःचे काही फोटो शेअर करत म्हटले आहे – ‘नवरात्रीचा उपवास कोण कोण करतेय? मीही उपवास करते आणि हे फोटो आजच्या पूजेचे आहेत. याचदरम्यान माझ्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. माझ्या मते, महाराष्ट्रात बसलेली पप्पू सेना माझ्यावर भाळली आहे. मला इतके मिस करू नका. मी लवकरच तिकडे येणार आहे.’

प्रकरण

मोहम्मह अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे सत्र न्यायालयात तक्रार केली होती. सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणौतने बॉलिवूड आणि एका समाजाविरोधात वक्तव्ये केली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सोबत त्याने कंगनाचे ट्वीट, व्हीडीओ न्यायालयात सादर केले होते. यावर सुनावणी करताना न्यायालयाने कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपात कोर्टाच्या आदेशानंतर तिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER