राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ; खासदार आदिती तटकरेंचे बॅनर हटवले

ncp-volunteers-protest - Maharastra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे . खारघर शहर अध्यक्ष पदावरुन सुरू झालेला वादंग आता पनवेलमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रवादी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही, तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांचे बॅनर कार्यालयावरील हटवले गेले.

सतीश पाटील हटाव, पनवेल राष्ट्रवादी बचाव, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी शनिवारी खारघर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी याबाबत गंभीरपणे दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. अन्यथा, पनवेलमधील सुमारे 250 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पदाचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा देऊ, अशी भूमिका देखील मांडण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER