पवारांची कार्यशैली म्हणजे खेळीमेळीच्या राजकारणाचे प्रतिक, पंकजा मुंडेंनी केले कौतुक

Sharad Pawar-Pankja Munde

पुणे : ऊसतोड मजुरांच्या वेतन वाढीचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharda pawar) यांनी एका बैठकीत निकाली काढला. या बैठकीत शरद पवार हे सलग आठ तास बसून होते. एखाद्या नेत्याची कार्यक्षमता आणि कामाबद्दल आदर व्यक्त केला तर त्यात काय चुकले? आम्ही त्यांच्या निम्म्या वयाचे असतानाही अधुनमधुन उठत होतो. कोणी पाणी प्यायला किंवा अन्य कारणांसाठी जागेवरून उठले असताना पवार साहेबांची ही कार्यशैली आवडल्याचे मत व्यक्त करणे म्हणजे महाराष्ट्राच्या खेळीमेळीच्या राजकारणाचे ते प्रतिक आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे (pankja munde) यांनी पवार यांच्या कार्यशैलीचे कौतुक केल्यामागची कारणे सांगितली.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख वारंवार तुमच्या बोलण्यात येतात, या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की साखर कारखानादारीचा आणि त्यांचा प्रश्नांचा सर्वाधिक अभ्यास आणि अनुभव हा शरद पवारांचा आहे. त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय या क्षेत्रात कोणी योग्य निर्णय़ घेऊ शकत नाही. एक टप्पा असा आला होता की या प्रश्नी आम्हाला वारंवार बोलावे लागत होते. साखर उद्योगांच्या प्रश्नांविषयी पवारांना, नितीन गडकरींना आम्ही भेटतच असतो. पण पवारांचा उल्लेख करू नये, असा नियम तर नाही ना, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. समजा मी त्यांचे कौतुक केले तर ते माझ्याविरुद्ध राष्ट्रवादीचा उमेदवार देणार नाहीत का? आपण सतत राजकारणच केले पाहिजे का, अशी विचारणा त्यांनी केली.

ऊसतोडणी मजुरांमध्ये तुम्हाला पर्याय नेतृत्त्व तयार करण्याचे प्रयत्न झाले का याबाबत त्या म्हणाल्या, एवढ्या लोकांना वंचित घटकाचा कळवळा आहे, हे पाहून बरे वाटले. सुरेश धस यांनी पक्षाकडे या प्रश्नी मेळावे घेण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षाने त्यांनी परवानगी दिली. त्याचे मला वाईट वाटायचे कारण नाही. ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाला पक्षीय स्वरूप येऊ द्यायचे नव्हते. ९९ टक्के कारखाने हे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे होते. एका पक्षाचे कारखाने आणि एका पक्षाचे कामगार असे पक्षीय स्वरूप या प्रश्नाला मी दिले तर अडचणीचे होईल. त्यामुळे शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांनी अतिशय परिपक्वपणे निर्णय घेतले. तीच लवादाची परंपरा पुढे मी पुढे चालवली.

ही बातमी पण वाचा : कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना पवारांकडून न्याय, सातवा वेतन आयोग लवकरच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER