पंकजा मुंडेंकडून पवारसाहेबांचे कौतुक ; रोहित पवार म्हणाले, ताई हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती

Rohit Pawar-Sharad Pawar.jpg

मुंबई : पुण्यात ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक तोडगा काढला . बैठकीनंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कार्यशैलीचं तोंडभरून कौतुक केले. यावर राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभारही मानले आहेत.

धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे, असं म्हणत रोहित पवारांनी पंकजा मुंडेंचं कौतुक केलं आहे. अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान शरद पवारांचे कैतुक करत पंकजा मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की , पवारसाहेब हॅट्स ऑफ…कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले…पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,’ असं ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER

.