पंकजा भाजप सोडण्याचा विचार करू शकत नाही : मामा प्रकाश महाजन यांचे मत

औरंगाबाद :- गोपीनाथ मुंडे यांनी भाजप वाढवला, याचे भान त्यांना आहे. स्वतःशी चिंतन करणे कधीही चांगले असते. तेच त्या करत आहेत, म्हणत पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन म्हणाले, त्या कधीही भाजप सोडण्याचा विचार करू शकत नाही. त्यांच्या ‘फेसबुक पोस्ट’चा मीडियाने वाटेल तसा अर्थ लावला. तशा ते बातम्याही करू शकतात.

पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? याबाबत येत्या 12 डिसेंबरला म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले.

भाजप नेत्यांनीच पंकजा मुंडेचा गेम केला : विजय वडेट्टीवारांचा आरोप

पंकजांची फेसबुक पोस्टसध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. दुसरीकडे, पंकजांच्या फेसबूक पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पंकजा 12 डिसेंबरला कोणता राजकीय भूकंप करतात, काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.