एखादी गोष्ट सत्यात उतरत नाही तोपर्यंत… एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी २२ ऑक्टोबर रोजीचा मुहूर्तही ठरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे खडसेंबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, एकनाथ खडसे पक्ष सोडणार नाहीत असा दावा भाजपाचे ((BJP) सर्वच नेते करत आहेत.
मध्यंतरी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांची पक्षावरची नाराजी उघडपणे दिसत होती. पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावरुन एकनाथ खडसेंनी पक्षांतर्गत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पंकजा मुंडेही (Pankja Munde) तेव्हा पक्षाच्या सक्रीय कार्यातून बाहेर पडल्या होत्या.

मात्र गेल्याच महिन्यात पंकजा मुंडे यांना भाजपाने राष्ट्रीय कार्यकारणीत संधी दिली, त्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात दिसू लागल्या. सध्या पंकजा अतिवृष्टी भागात आहेत. त्यावेळी त्यांना एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर विचारले असता त्या म्हणाल्या, चर्चा चर्चा असताच जोपर्यंत सत्यात उतरत नाही, चर्चा ऐकायच्या असतात, ज्या गोष्टी घडल्याच नाहीत त्यावर भाष्य कशाला करायचं? मला वाटत नाही खडसेसाहेब पक्ष बदलण्याचा निर्णय घेतील असं त्यांनी प्रतिक्रिया दिली.

तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नाथाभाऊ पक्ष सोडणार नाही अशी भावनीक साद घातली.

तसेच, ज्यांच्या नावाने खडसे जाहीरपणे आरोप करत असतात त्यांनीही एकनाथ खडसे पक्ष सोडून जाणार नाहीत असे म्हटले आहे. खडसे आमचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी आमचे सोबत राहीले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यांना राजकारण नीट कळते. त्यामुळे ते पक्ष सोडून जाणार नाहीत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीतील संभाव्य प्रवेश रोखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचा नाथाभाऊंना फोन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER