पंकजा मुंडेंचे ‘ते’ विधान अत्यंत दुर्दैवी : सुनील केदार

pankaja munde - sunil kedar - Maharashtra Today

पंढरपूर : ओबीसी समाजाला आरक्षण आणि योग्य प्रतिनिधित्व मिळणार नसेल तर राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला होता. यावर पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा यांनी हे विधान करणे दुर्दैवी आहे, असे सुनील केदार म्हणाले. राज्यात पशुपालन विभाग माडग्याळ जातीच्या मेंढीचे प्रजनन वाढविण्यासाठी काम करत आहे. यासाठी महूद येथील शेळी-मेंढीपालन प्रक्षेत्र येथे पाहणी करण्यासाठी सुनील केदार आले होते. यावेळी ते म्हणले की, ‘सामाजिक आणि संवेदनशील प्रश्नांवर बोलताना लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येने केविलवाणे वक्तव्य करावे हे दुर्दैवी आहे.’ तसेच काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेल्यांना महाराष्ट्रमुक्त करण्यात आले, हे काय कमी आहे का? असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

मतांसाठी राजकारण करा, पण…
पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून काम पाहिले आहे. अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. ओबीसींच्या नेत्या म्हणून प्रतिनिधित्व करताना अशा पद्धतीचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. राजकारणासाठी आणि मतांसाठी राजकारण जरूर करावे. पण समाजाच्या संवेदनशील प्रश्नावर बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या घरातून अशा पद्धतीचे वक्तव्य येणे हे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button