पंकजा मुंडेंच्या उपोषणाला सुरुवात

Pankaja Munde

औरंगाबाद : पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आक्रमक होऊन आज सोमवारी लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर महाविकास आघाडीचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उपोषण केले आहे. खासदार प्रीतम मुंडे तसेच भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत या उपोषणाला सुरुवात झाली. त्यांच्यासोबत माजी मंत्री महादेव जानकर देखील उपस्थित आहेत.

पंकजा मुंडेंच्या उपोषणात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचाही सहभाग

तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी सरकारने लवकरात लवकर पावले उचलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच उपोषणादरम्यान मराठवाड्याचा पाणीप्रश्न त्यांनी आधोरेखित केला आहे. यावर बोलताना, हे उपोषण अपेक्षांसाठी आहे; आक्षेपांसाठी नाही, असे त्यांनी सांगितले.

सरकारने लक्ष दिले नाहीतर ही लढाई रस्त्यावर : फडणवीस
मारठवाड्याच्या हक्काचं पाणी देण्यासाठी आमच्या सरकारने प्रयत्न केले. मराठवाड्याचे पाणी आघाडी सरकारने पश्चिम महाराष्ट्राकडे पळवून नेलं.अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली. सरकारने लक्ष दिले नाही तर ही लढाई रस्त्यावर असा इशारापण त्यांनी यावेळेस दिला.