पंकजा मुंडेंचा निर्णय : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर बहिष्कार

Pankaja Munde - Maharastra Today

बीड :- उद्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होणार असून यापूर्वीच भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार बँकेच्या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली. उद्या म्हणजेच २० मार्च रोजी ही निवडणूक होत आहे. मात्र ही निवडणूक नव्याने घेण्याची मागणी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. निवडणूक लढवूनही फोरम पूर्ण होत नसल्याने बहिष्कार टाकण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसंदर्भात थेट राज्यपालांकडे तक्रार केली होती. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज बाद करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक लढण्यास रोख लावला. औरंगाबाद आणि इतर जिल्ह्यांना जो न्याय दिला, तो बीडला नाही हे दुर्दैव आहे, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. हे सर्व म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जिल्हा बँक बरखास्त करण्याचे रचलेले कारस्थान असून, या गैरप्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांना एका निवेदनाद्वारे केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER