ऊसतोडणी कामगारांसंबंधी पंकजा मुंडे यांचा हा निर्णय बदलला

Pankaja Munde

मुंबई : ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरवाढीचा करार हा पूर्वीप्रमाणेच तीन वर्षांचाच होणार आहे. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हा करार तीनऐवजी पाच वर्षांतून एकदा केला जाईल, असा निर्णय घेतला. राज्य संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात कामगार संघटना प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

यामुळे कामगार संघटनेच्या पाच वर्षांपासूनच्या लढ्याला यश आले असून, कामगारांचे होणारे नुकसान थांबले आहे. हंगाम सुरू होण्याआधी दरवर्षी ऊसतोडणी-ओढणीचा दर सरकार निश्चित करते. दर तीन वर्षांतून एकदा सामंजस्य करार केला जात होता; पण राज्यात भाजपचे (BJP) सरकार आल्यानंतर तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी हा करार तीनऐवजी पाच वर्षांतून एकदा केला जाईल, असा निर्णय घेतला. तेव्हापासून संघटनेने हा निर्णय मागे घेऊन पूर्वीप्रमाणे तीन वर्षांचा करार करावा, अशी मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER