पंकजा मुंडेंना केंद्रात महत्वाची जबाबदारी मिळणार – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil-Pankaja Munde

मुंबई : आज भाजप महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांची यादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईच्या प्रदेश कार्यालयात जाहीर केली. १२ उपाध्यक्ष आणि ५ सरचिटणीसांचा समावेश असलेल्या यादीत कोणाची वर्णी लागते त्याकडे सर्वांचं लक्ष लागेलेले होते.

दरम्यान, आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार का अशी चर्चा सुरु होती. मात्र पंकजा मुंडेंना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्रात मोठी महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र त्यांच्याठिकाणी खासदार प्रितम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

ही बातमी पण वाचा:- भाजपचा पुन्हा पंकजा, खडसे, मेहतांना धक्का?

पंकजाताईंना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्वाची जबाबदारी मिळणार आहे. कोअर कमिटीच्या सदस्या शंभर टक्के असतील, केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल”, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. प्रितम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यांना जबाबदारी दिली असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, कोरोना संकटामुळे भाजपची कार्यकारणीची घोषणा करण्यास वेळ लागला. कोणतीही घोषणा सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते. त्यामुळे थोडा वेळ लागला. माझ्याबरोबर १२ प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ५ सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस आहेत. या व्यतिरिक्त एक महामंत्री संघटन म्हणजे सरचिटणीस संघटण असे ६ सरचिटणील आहेत. १ कोषाध्यक्ष व्यतिरिक्त १२ सरचिटणीस आहेत.

या प्रमुख कार्यकारणीत माझ्यासोबत १२ प्रदेश उपाध्यक्ष, १२ सेक्रेटरी, ६ जनरल सेक्रेटरी आणि १ कोषाध्यक्ष आहेत. याशिवाय ७ प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त १८ प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत आहोत”. असेही पाटील यावेळी म्हणाले.

भाजपची घोषित कार्यकारिणी

महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

उपाध्यक्ष – राम शिंदे, जयकुमार रावळ, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हळवणकर, खा. प्रितम मुंडे, चित्रा वाघ, प्रसाद लाड, कपिल पाटील, भारती पवार, जयप्रकाश ठाकूर.


 
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER