शरद पवार UPA ला फायदा करून देतील, पण… – पंकजा मुंडे

Pankaja Munde & Sharad Pawar

मुंबई :- राज्यात आणि देशपातळीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. यामागाचं कारण म्हणजे गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रे  स्वीकारतील असा दावा केला जात आहे. यावर भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडेंनीही शरद पवार यांच्या अध्यक्षपदाचा यूपीएला फायदा होईल, असे म्हटले आहे. पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजेच यूपीएचे अध्यक्ष झाले तरी भाजपाला त्या निवडीचा काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात भाजप मजबूत आहे, मोदींचं नेतृत्व सक्षम आहे. मात्र, शरद पवार यांच्या नेतृत्वाचा यूपीएला निश्चितच फायदा होईल, असे पंकजा मु़ंडे यांनी म्हटले.

शरद पवार यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांच्या सोशल इंजिनीअरिंगचा ते यूपीएला फायदा करून देऊ शकतात. पण, याची आम्हाला चिंता नाही. कारण भाजपला काहीही फरक पडणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER