‘या’ विषयावर शांत राहणार नाही ; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

Pankaja Munde-Thackeray Govt

मुंबई :- एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Rservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरून भाजपच्या (BJP) सरचिटणीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सरकारवर (Thackeray Govt) निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इतर मागासवर्गास न मिळणारे आरक्षण अन्याय करणारे असून या विषयावर शांत राहणार नाही. राज्य सरकारला ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे असे वाटतच नाही, त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू मांडली नाही, असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.

मंत्रिमंडळाने ‘इम्पेरिकल डाटा’ तयार करण्यासाठी समिती स्थापन करावी आणि ओबीसी आरक्षणाचे हित जपावे, अशा सुचना त्यांनी ठाकरे सरकारला दिल्या आहेत. ज्यांना आरक्षण आहे त्यांना देखील आरक्षण देण्यास सरकार कमी पडत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना सरकार कमी पडलंच आहे. आता आरक्षण विषयात दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जनगणनेकडे आरक्षणाचा विषय वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही मुंडे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या ; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button