मलाही वाढीव वीजबिलाचा फटका बसला, दुतोंडी सरकारने आश्वासन पूर्ण करावे – पंकजा मुंडे

Pankaja Munde

मुंबई : हे सरकार दुतोंडी आहे. सरकार मोठाले आश्वासन देते मात्र, त्याला पूर्ण करण्यात मागेपुढे बघत असते. वाढीव वीजबिलाचा मलाही फटका बसला आहे, असं म्हणत वाढीव वीजबिलाच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja munde) यांनी केली. मुंडे यांनी आशा सदन अनाथाश्रमाला भेट दिली. दिवाळीनिमित्त त्यांनी अनाथ मुलांना खाऊ दिला. यावेळी मुंडे बोलत होत्या.

लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीजबिल आल्याने राज्यातील कित्येक नागरिकांना मोठा फटका आहे. वाढीव आलेले वीजबिल कमी करण्याची मागणीही राज्यातील नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यातील सरकार दुतोंडी आहे. सरकार फक्त आश्वासन देतं मात्र त्याची पूर्तता करत नाहीत. वाढीव बिलाची मीसुद्धा शिकार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वाढीव वीजबिलाबाबत लक्ष घालावं, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER