पंकजा मुंडेंना धक्का, …आणखी एक भाऊ राष्ट्रवादीत!

परळी : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे चुलत बंधु रामेश्‍वर मुंडे यांनी – भाजपामध्ये कार्यकर्त्यांचे कुठेलच काम होत नाही, सातत्याने अन्याय होतो, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या आरोपात अप्रत्यक्षपणे रामेश्वर मुंडे यांनी पंकजा मुंडे याच्यावर टीका केली. उल्लेखनीय म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांचे बंधु व्यंक्टराव यांचे चिरंजीव असलेले भाजपाचे तरुण नेते रामेश्‍वर आतापर्यंत पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभे होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे हा या भागात भाजपाला मोठा धक्का आहे.

भाजपाची परळी शहरातील यंत्रणा रामेश्वर यांच्या नियंत्रणात होती, यावरून त्यांचे राजकारणातील महत्व लक्षात येते. महत्वाचे म्हणजे आता पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या सोबत आता मुंडे घराण्यातील एकही भाऊ राजकरणात सोबत राहिलेला नाही.