मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार शिवसेनेच्या ऑफरवर पंकजा मुंडे म्हणाल्या….

Pankaja Munde

मुंबई : भाजपा (BJP) नेत्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना शिवसेनेने पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्या ऑफरवर पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) सूचक प्रतिक्रिया दिली आहे. मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार आहे. मी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची जुगलबंदी ऐकलेली आहे. मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत. या गोष्टी राजकारणाचा एक भाग आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुलाखतीत त्या बोलत होत्या .

भगवान गडावरून पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. मला एवढ्या मोठ्या जमावासमोर बोलताना एक वेगळीच शक्ती अनुभवायला मिळते. ही सीमोल्लंघनाची परंपरा मुंडे साहेबांपासून चालत आलेली आहे. भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संबंध देशात फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतो. गरीब आणि कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी येतो, असं पंकजा मुंडेंनी सांगितले .

दरम्यान मी एकनाथ खडसेंबद्दल आधीच बोललेली आहे, मी दुःख व्यक्त केलं आहे. त्याचाबद्दल मला धक्का बसल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER