रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो ; ‘चला हवा येऊ द्या‘ मधून पंकजा मुंडेंचा टोला

Rohit Pawar - Pankaja Munde

मुंबई : ‘चला हवा येऊ द्या‘च्या (Chala Hawa Yeu Dya) सेटवर नेहमी मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांची लगबग असते. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांपासून तर अनेक राजकीय नेत्यांनी या शोमध्ये हजेरी लावलेली आहे . भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), राष्ट्रवादीचे (NCP) युवा आमदार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar), भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) या राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’चा विशेष भाग रंगला .

पंकजा मुंडे यांनी पती अमित पालवे यांच्यासोबत हजेरी लावली. तर खासदार सुजय विखे पाटीलही पत्नी धनश्री विखे यांच्यासह हजर होते. नेहमी हसऱ्या-खेळत्या सेटवर नेते मंडळींच्या हजेरीमुळे राजकीय वातावरण तापणार की काय, अशी शंका होती. मात्र मिश्की ‘ ल टोलेबाजीत हा भाग चांगलाच रंगला.

तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू, असा टोला पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना लगावला. राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर पंकजांचा रोख होता, हे सांगायला राजकीय विश्लेषकांची गरज नाही. “सुजयची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत” असा टोमणा पंकजांनी मारताच “घरच्यांना माहिती असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे” असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलं.

चला हवा येऊ द्या’च्या सेटवर सहभागी झालेल्या जोडप्यांसोबत एक खेळ खेळण्यात आला. रिंग टाकून वस्तू जिंकण्याचा हा खेळ होता. यामध्ये चलाखीने घड्याळाचा समावेश करण्यात आला होता. योगायोगाने भाजप नेते सुजय विखे यांची पत्नी धनश्री आणि पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे यांनी रिंग टाकली आणि नेमकी घड्याळावर पडली, हे पाहता या खेळामधून राजकीय निशाणाही साधण्यात आला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER