मोदी सरकारला पंकजा मुंडेंचा घरचा आहेर ; ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून दिली आठवण

Pankaja Munde & Modi

मुंबई : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मुद्दे उचलण्यास सुरुवात केली आहे . हे. पंकजा यांनी आता थेट ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी भाजपचे नेते, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्विट करून मोदी (PM Narendra Modi) सरकारलाच ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून दिली आहे.

आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आहे आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिंदीत हे ट्विट केले आहे. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना आपण काय लिहिले हे समजण्यासाठीच त्यांनी हिंदीत हे ट्विट लिहिलं असावे , असे राजकीय जाणकार सांगतात.

पंकजा यांनी पोस्टसोबत एक व्हिडीओही अपलोड केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे लोकसभेतील गोपीनाथ मुंडे यांचं 18 मिनिटाचं भाषण आहे. त्यात त्यांनी लोकसभेतील उपनेते म्हणून ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर भाजपची सत्ता आली पण अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही. आज खुद्द पंकजा मुंडेंनी हिंदीत ट्विट करत सरकारला ओबीसींच्या जनगननेची आठवून करून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER