मुंडे साहेबांच्या पुण्यातिथीला गडावर गर्दी करू नका; घरातच दोन दिवे लावा – पंकजा मुंडे

Pankaja Munde on Gopinath Munde Death anniversary

बीड: येत्या 3 जूनला भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. गोपीनाथराव मुंडे यांची जयंती असो वा पुण्यतिथी त्यांचे चाहते, समर्थक दरवर्षी गोपीनाथ गडावर एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने, यंदाची पुण्यतिथी सर्वांनी घरातच साजरी करावी असे आवाहन त्यांची कन्या व भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबूक पोस्टवरून केली आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करायचा आणि घरातच फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करायचं, असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल, मात्र कार्यक्रम लाईव्ह असेल, कोणीही गडावर गर्दी करु नये, अशा सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या.

3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात.

पंकजा मुंडे यांची वडीलांच्या पुण्यतिथीनिमित्तची भावनिक पोस्ट –

“३ जुन” तसं मी या दिवसाची वाट अजिबात पाहत नाही!! अगदी २ जुन २०१४ ला जाऊन जग थांबावं असं वाटतं मनात. आनंद, उत्साह, समाधान होतं २ जुन ला.

बाबा पोटभर रस पोळी खाऊन गेले होते.. शाहू म्हणाला,”आज साहेबांनी खूप आमरस खाल्ला’..”खाऊ देरे शाह” असं त्याला तेच म्हणाले..तेच अखेरचं जेवण त्यांचं स्वतःच्या घरी. मग तर पार्थिव देखील घरी आणता आलं नाही.. म्हणून ३ जुन उजाडलाच नाही पाहिजे असे वाटते..

तरी झाले की वर्षे पूर्ण, आपण जगतोय आणि जगावतोयही मुंडे साहेबां स्मृती, त्यांचे विचार, त्यांच्या प्रति चं प्रेम… कारण तीच आपली शक्ती आणि पुढील मार्गावर जाण्याची प्रेरणा आहे.. हो ना??

सध्या कोरोनाच्या या थैमानात सर्वांना प्रतिकार शक्ती व उत्तम आरोग्य लाभो हीच माझी प्रार्थना आणि शुभेच्छा आहे. आणि त्यानुसारच ३ जून च नियोजन असावं..

तसं ३ जुन चा दिवस “सघर्ष दिन” म्हणून आपण साजरा करतो, गोपीनाथ गड माणसांनी तुइंब भरलेला असतो, ढोक महाराजांचं किर्तन असतं, मग प्रमुख कार्यक्रम आणि प्रसाद असा दरवर्षीचा नियम असतो.. पण यावेळी संघर्ष वेगळा आहे. सर्वांनी कोरोना मुळे काळजी व लॉकडाउनच्या नियमाचे पालन करायचे आहे. ही माझी विनंती आहे. यावर्षी कोणीही गर्दी करायची नाही दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठी देखील नाही…

गडाचा कार्यक्रम साधा व मोजक्या लोकांत असेल, तो Live दाखवता येईल.

तुम्ही सांनी कुटुंबा समवेत मुंडे साहेबांच्या फोटो समोर उजव्या बाजूला घरातील महिला आणि डाव्या बाजूला पुरुष उभे राहून दोन दिवे समई लावायचे आहेत.

आजी, सुन, नात उजवीकडे, तर आजोबा, मुलगा, नातू डावीकडे असं उभं राहन दिवा लावायचा आहे. साहेबांचा आवडता पदार्थ बनवयाचा, तो काय मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. हे दोन दिवे लावण्यास मी सांगितले ते स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे.

कोणतही एक समाज कार्य करायचं, कोरोनाच्या पा््वभूमीवर मदत, अनदान, रक्तदान, मास्क किवा औषधांचे वाटप इत्यादी.

सर्व कुटुंबीयांनी आणि हे सर्व करतानाचे फोटो माझ्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर पाठवायचे आहेत, दुपारी १२ ते सायं. ०६ मध्ये आपण हे कार्य करून कराते आणि स्वत ला जपा गढ़ी कर नका.

कृपया शेअर परत राहा तुमच्या जीवाची काळजी साहेबांच्या एवढीच मला आहे

कराल मग एवढ ?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER