मुख्यमंत्री माझे भाऊ, आमच्यात पक्षीय राजकारण येत नाही – पंकजा मुंडे

नांदेड : यंदाचा दसरा तर शेतकऱ्यांना साजरा करता आला नाही, आता राज्य सरकारने तातडीने मदत देऊन शेतकऱ्यांची दिवाळी प्रकाशमय आणि गोड करावी, अशी मागणी माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. मात्र भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे पंकजा यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी आज नांदेडमध्ये पीक नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, नांदेड मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. आता राज्य सरकारने उशीर करू नये. प्रत्येक पिकाबाबतचे थोकताळे ठरवून शेतकऱ्यांना आताच मदत देणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि मी आम्ही बहीण भाऊ आहोत, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमच्या नात्यामध्ये पक्ष आणि बाकी राजकारण येऊच शकत नाही. मुख्यमंत्री माझे भाऊ आहेत. पण भाऊ म्हणून नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे मुंडे म्हणाल्या. केंद्राकडून मदत मिळावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER