पंकजा मुंडे नाराज नाहीच, स्वतः केला खुलासा

Pankaja Munde

बीड : भाजपच्या (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षात अजूनही डावलले जात असल्यामुळे मराठवाड्यातील पक्षबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना त्या उपस्थित राहत नसल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. यासोबतच त्यांच्या पक्षांतरणाच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण खुद्द पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन दिल आहे.

दिवसभर सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पंकजा मुंडे यांनी खुद्द स्पष्टीकरण दिले आहे.”आ. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) (प्रदेशाध्यक्ष भाजप) यांची व माझी दोन दिवसांपूर्वीच भेट झाली होती. यात सविस्तर चर्चाही झाली, मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, याबद्दलही बोलणे झाले. ही संघटनेची आढावा बैठक होती, त्यापूर्वीच्या संध्याकाळी मी कोअर कमिटीची बैठक केली होती…दादा माझ्या घरी ७ तारखेला नाष्टा करण्यासाठी आले होते, आमच्या छान गप्पाही झाल्या.” असं ट्विट करून त्यांनी नाराजीच्या चर्चेवर पडदा टाकला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER