‘पंकजा चांगलं काम करत आहेत’, पवारांच्या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण

Sharad Pawar & Pankaja Munde

नाशिक : महाराष्ट्रात भाजपाला मोठं करणाऱ्या एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर मोठे पाठबळ असलेल्या पंकजा (Pankaja Munde) य़ा शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा सुरु होती. यातच पंकजांनी शरद पवारांचे (Sharad Pawar) कौतुक केल्याने राजकीय़ चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचं कौतुक करून २४ तास होत नाहीत तोच पवारांनीही पंकजा मुंडे यांचं कौतुक केलं आहे. पंकजांच्या या कौतुकाला शरद पवारांनी नाशिकमध्ये प्रतिसाद देत पंकजादेखील चांगले काम करत असल्याची कौतुकाची थाप मारली आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातल्या बैठकीत हजर होत्या. त्यांचं या विषयात काम आहे आणि त्या चांगलं काम करत आहेत असंही पवारांनी म्हटलं आहे. पवारांनी केलेल्या कौतुकामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

भाजपमधून एकनाथ खडसे नुकतेच राष्ट्रवादीमध्ये गेलेत. खडसे हे भाजपमध्ये नाराज होते. विधानसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे याही नाराज होत्या. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. मंगळवारी पंकजा मुंडे या ऊसतोडणी कामगारांच्या बैठकीला उपस्थित होत्या. त्या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते. त्यानंतर रात्री उशीरा पंकजा मुंडे यांनी ट्विट करत पवारांचं कौतुक केलं होतं. या वयातही पवार ज्या झपाट्याने काम करता हे कौतुकास्पद आहे असं पंकजाताईंनी म्हटलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER