पंकजा मुंडे अडचणीत

Pankaja Munde

मुंबई : महिला व बालकल्याण खात्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे अडचणीत आल्या आहेत. पंकजा मुंडे यांचे नियंत्रण असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परवाना निलंबित केल्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) सहायक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांच्यावर निलंबनाची व विभागीय चौकशीची कारवाई करण्यात आली होती.

मात्र, केरुरे यांनी आपले अधिकार योग्यपणे वापरल्याचे आता, भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणानेच स्पष्ट केले आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण ही संस्था केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत आहे, हे येथे उल्लेखनीय.

भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या ‘क्लीन चिट’नंतर महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) आता, पंकजा मुंडे आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि डॉ. पल्लवी दराडे अडचणीत आल्या आहेत. या एकूणच प्रकरणावर आता, ४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

शिवसेनेची नोंदणी रद्द करा : सदाभाऊ खोत