प्रदेश कार्यकारणीत वर्णी न लागल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

Pankaja Munde

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर झाली. या कार्यकारणीत माझ्यासोबत १२ प्रदेश उपाध्यक्ष, १२ सेक्रेटरी, ६ जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर पहिली प्रतिक्रिया दिली.

भाजपाची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील ट्विट प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाले की, ‘नवीन भाजपाच्या टीमचे अभिनंदन. तसेच माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार’.

दरम्यान, दरम्यान, आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार का अशी चर्चा सुरु होती. मात्र पंकजा मुंडेंना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्रात मोठी महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र त्यांच्याठिकाणी खासदार प्रितम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER