पंकजा मुंडेंच्या उपोषणात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचाही सहभाग

Fadnavis- chandrakant patil- pankaja munde

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याच्या गंभार समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या आज उपोषण करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या उपोषणात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेचते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाही सक्रीय सहभाग असणार आहे. औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता हे उपोषण सुरु होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा स्तुत्य उपक्रम शाळांमध्ये ; ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’

भाजपाचे इतर महत्त्वाचे नेतेही या उपोषणात सहभागी होणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार असल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. किमान अडीच ते तीन हजार कार्यकर्ते उपोषणात सहभागी होतील, असे नियोजन करण्यात येत आहे.