मी संपले असं वाटणाऱ्यांनी ही जनसंपत्ती पाहावी; पंकजा मुंडेंचा विरोधकांना टोला

Pankja Munde

बीड: दसऱ्या मेळाव्यानिमित्त ऑनलाइन मेळावा असूनही राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक भगवानगडावर आले. आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोक आले, असं सांगतानाच निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे (Pankja Munde) संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.यावेळी ‘कोण आली रे कोण आली… महाराष्ट्राची वाघीण आली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने भगवानबाबांच्या 25 फुटी मूर्तीला फुलांची सजावट करण्यात आली आहे. भगवानबाबांच्या स्मृतिस्थळ परिसरात पंकजा मुंडे ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भगवान बाबा स्मृतिस्थळ परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER