‘जनतेने बहुमत दिलेले नसतानाही…’ पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका

Pankaja Munde - CM Uddhav Thackeray

मुंबई : भाजपा (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे . एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वांत  प्रथम मी सरकारचे अभिनंदन करते. एक वर्ष पूर्ण होते की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम होता. जनतेने बहुमत दिलेले नसतानाही ते सत्तेत आहेत. त्यामुळे सत्ता टिकवणं हे त्यांचे ध्येय आहे असे मला वाटते.

जनतेचे हित दुय्यम अशी परिस्थिती आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. कोरोनाचा (Corona) सामना करणं सरकारसमोर आव्हान आहे. सरकारसाठी हे नक्कीच त्रासदायक आहे. जनहितासाठी आम्ही सहकार्याची भूमिका नक्की ठेवू, असे आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिले. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देताना ओबीसीच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये याबद्दल आम्ही सर्वांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या मराठा आरक्षणाबाबत जे झालं आहे ते अत्यंत निराशाजनक आहे.

मराठा तरुणांमध्ये, समाजात तीव्र संताप आणि खेद आहे. सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. केंद्र शासनाकडे त्यासंबंधी प्रस्ताव पाठवला पाहिजे. सात दशकांपासून धनगर समाज आरक्षणाची वाट पाहात आहे. र चा ड करण्यासाठी त्यांना ७० वर्षे  वाट पाहावी लागत आहे हे दुर्दैवी. हा विषय हाताळण्यात सरकारने गती घेतली नाही. विषयाला हातच लावलेला नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER